महाराष्ट्राचे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव ऐकताच देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी अजित पवार यांना शपथ घ्यावी लागणार असल्याचे सांगितले

अजित पवार यांनी २०१९च्या नोव्हेंबर महिन्यात अमित शहा यांना सरकार-स्थापनेसंदर्भात फोन केला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मूळ योजनेनुसार पुढे जाण्याचे निश्चित केले होते. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३५ ते ३८ आमदारांशी बोलणी केली होती आणि त्यांनीदेखील पवारांना पुढे जाण्यास सांगितले होते. भाजपच्या बाजूला येऊ पाहणाऱ्या या आमदारांना आश्वस्त करण्यासाठी फडणविसांनी त्यांना फोन केले.......